Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Heatwave Alert: राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, ब्रह्मपुरीत ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: सूर्य आग ओकायला लागल्याने उन्हाचा चटका भाजून काढायला लागला आहे. कमाल तापमान चाळिशीपार असून, शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २९) राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. उन्हाची ताप वाढल्याने शुक्रवारी (ता. २८) ब्रह्मपुरीसह नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा, अमरावती येथे ४१ अंशांपेक्षा तापमानाची नोंद झाली. तसेच जेऊर, परभणी, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि वाशीम येथे तापमान ४० अंशांच्या वर होते.

ढगाळ हवामानामुळे उकाड्यात चांगलीच वाढ झाली असून, दुपारच्या वेळी अंगाची लाही होत आहे. आज (ता. २९) कमाल तापमानातील वाढ, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा आहे. तर रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.४---१८.२

अहिल्यानगर---३६.९---२०.३

धुळे---३८.५---१६.५

जळगाव---३९.०---२३.२

जेऊर---४०.०---१९.०

कोल्हापूर---३६.३---२२.१

महाबळेश्‍वर---२९.२---१९.४

मालेगाव---निरंक---२१.६

नाशिक---३४.२---१९.०

निफाड---३५.५---१४.८

सांगली---निरंक---२१.३

सातारा---निरंक---१९.६

सोलापूर---३९.४---२५.३

सांताक्रूझ---३१.३---२२.३

डहाणू---३१.८---२१.६

रत्नागिरी---३२.६---२३.८

छत्रपती संभाजीनगर---३८.८---२४.८

धाराशिव---३८.२---२२.२

परभणी---४०.०---२३.९

परभणी (कृषी)---३९.४---२०.१

अकोला---४१.७---२५.०

अमरावती---४१.०---२२.३

भंडारा---४०.०---२२.४

बुलडाणा---३७.३---२३.८

ब्रह्मपुरी---४२.२---२१.७

चंद्रपूर---४१.६---निरंक

गडचिरोली---४०.६---२०.०

गोंदिया---३९.५---२०.२

नागपूर---४१.९---२२.४

वर्धा---४१.५---२५.६

वाशीम---४०.२---निरंक

यवतमाळ---४०.८---२३.२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.०---४२.२

मराठवाडा---२०.१---४०.०

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.२---४०.०

उत्तर महाराष्ट्र---१४.८---३९.०

कोकण---२१.६---३२.२

४१ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ४२.२, नागपूर ४१.९, अकोला ४१.७, चंद्रपूर ४१.६, वर्धा ४१.५, अमरावती ४१.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली.

विजांसह पावसाचा अंदाज : रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT