Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे. आज (ता. ४) राज्यात तापमानातील वाढ कायम राहून, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

‘फेइंजल’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून कर्नाटक किनारपट्टीवर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. अरबी समुद्रात सरकत असताना या प्रणालीची तीव्रता कायम राहणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक आहे. मंगळवारी (ता. ३) पंजाबमधील भटिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १४ अंश तापमानाची नोंदले गेले. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी नाहीशी झाली आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.९ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ४) राज्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.६ (२१.७), अहिल्यानगर २८.२ (२२.४), धुळे २८ (१४), जळगाव ३०.८ (१८.८), जेऊर २९ (२०), कोल्हापूर २७.८ (२२.३), महाबळेश्‍वर २४ (१७.४), मालेगाव २८.४ (१८.४), नाशिक ३०.३ (१७.६), निफाड २८.९ (१९.०), सांगली २७.९ (२३), सातारा २७.७ (२२.३), सोलापूर ३१ (२३.६), सांताक्रूझ ३४.९ (२४), डहाणू ३२.९ (२१.१),

रत्नागिरी ३४.४ (२५.४), छत्रपती संभाजीनगर २८.२ (२२.४), धाराशिव २८.४ (२०.४), परभणी ३०.४ (२१.९), परभणी कृषी विद्यापीठ २९.३ (२२.४), अकोला ३०.३ (२२), अमरावती २८.४ (१९.८), भंडारा २८.४ (१९), बुलडाणा २९.६ (१७), ब्रह्मपुरी २८.६ (१९.८), चंद्रपूर २९.६ (१७), गडचिरोली २९ (१८.४), गोंदिया २९.२ (२०.२), नागपूर २९.७ (२१.४), वर्धा २९.२ (२०.२), वाशीम २९.६ (२०.२), यवतमाळ २९.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT