Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या गारपिटीचा इशारा

Team Agrowon

Pune Weather News : सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. यातच पावसाला पोषक हवामान (Weather) झाल्याने आजपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या (ता. ७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात गारपिटीची (Hail Storm) शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम येथे ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत आहे. पारा १४ ते २५ अंशांच्या दरम्यान होता.

छत्तीसगड पासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उद्या (ता. ७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३६.६ (१८.२), जळगाव ३८.५ (२०), धुळे ३८ (१६.५), कोल्हापूर ३६.१ (२१.६), महाबळेश्‍वर ३१.१ (१७.२), नाशिक ३५.४ (१८.७), निफाड ३५.२ (१४.५), सांगली ३७.१ (२१), सातारा ३७.५

(२०.१), सोलापूर ३९.७ (२१.१), सांताक्रूझ ३२.१ (२३), डहाणू ३१.७ (२२.४), रत्नागिरी ३१.६ (२२.३), छत्रपती संभाजीनगर ३६.७ (२१.४), नांदेड ३८.४ (२२.७), परभणी ३९.२ (२३), अकोला

३९.६ (२२.१), अमरावती ३९.४ (२०.५), बुलडाणा ३६.५ (२३.६), ब्रह्मपुरी ३९.८ (२३.९), चंद्रपूर ४०.४ (२४.६), गडचिरोली ३५.४ (२०.६), गोंदिया ३८ (२१.८), नागपूर ३८.८ (२२.३), वर्धा ३९.५ (२३.६), वाशीम ३९.२ (२०.६), यवतमाळ ३८.५ (२१.७).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर.
मराठवाडा : बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.
विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT