Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस गारपिटीचा इशारा

Pre-Monsoon Rain : राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे. आज (ता. १३) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता.१२) ओडिशातील संबलपूर येथे देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर, तसेच विदर्भातील नागपूर, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती, ‎परभणी, चंद्रपूर, ‎ब्रह्मपुरी, जळगाव, ‎वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, ‎‎जेऊर, ‎गडचिरोली, ‎गोंदिया, ‎नागपूर आणि ‎यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎धुळे, ‎सोलापूर, ‎धाराशिव आणि ‎वाशीम येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १३) मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सून आज अंदमानात ?

अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून, निकोबार बेटांवर रविवारपासून (ता. ११) मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने आज (ता. १३) नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान-निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत असल्याने चार ते पाच दिवसांतच मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३६.२---२४.०

‎‎धुळे---३८.०---२२.६

‎जळगाव---४०.०---२६.५

‎जेऊर---३९.५---२२.०

‎कोल्हापूर---३४.०---२३.६

‎महाबळेश्वर---२७.४---१७.६

‎मालेगाव---३६.६---२३.२

‎नाशिक---३३.२---२२.६

‎निफाड---३५.६---२४.४

‎सांगली---३५.७---२४.०

‎सातारा---३६.२---२२.०

‎सोलापूर---३८.९---२६.६

‎सांताक्रूझ---३४.६---२५.८

डहाणू---३३.८---२५.९

‎रत्नागिरी---३३.७---२६.३

‎छत्रपती संभाजीनगर---३६.६---२५.२

धाराशिव---३८.९---२३.०

‎परभणी---४०.४---२५.६

‎परभणी (कृषी)---३९.०---२५.५

‎अकोला---४१.३---२७.१

अमरावती---४०.८---२३.३

‎‎भंडारा---३७.०---२६.०

‎बुलडाणा---३६.२---२३.८

‎ब्रह्मपुरी---४०.१---२५.१

‎चंद्रपूर---४०.४---२६.८

‎गडचिरोली---३९.०---२५.२

‎गोंदिया---३९.४---२५.८

‎नागपूर---३९.१---२६.०

‎वर्धा---४०.०---२५.६

‎वाशीम---३८.६---निरंक

‎यवतमाळ---३९.०---२४.०

सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२३.३---४१.३

‎मराठवाडा---२३.०---३९.०

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१८.१---३८.९

‎उत्तर महाराष्ट्र---२२.६---४०.०

‎कोकण---२५.८---३४.६

वादळी पाऊस गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT