Rain Update Agrowon
हवामान

Weather Update : वादळी पावसाचा अंदाज

Weather Forecast : वादळी पावसाच्या सरी कोसळत असतानाच राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाच्या सरी कोसळत असतानाच राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. कमाल तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पार गेला आहे. आज (ता. १९) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, हलक्या गारपिटीने हजेरी लावली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान असून, आज (ता. १९) मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव आणि बीड येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, जळगाव, सोलापूर, धुळे, वाशीम, अकोला येथे तापमान ४२ अंशाच्या वर आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार पोचला आहे. आज (ता. १९) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.८, धुळे ४२.५, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ४३.२, नाशिक ४०.६, निफाड ३९.७, सांगली ३९.५, सातारा ४०.१, सोलापूर ४२.६, सांताक्रूझ ३४.७, डहाणू ३७.१, रत्नागिरी ३३.८,

छत्रपती संभाजीनगर ४०.५, बीड ४३.२, नांदेड ४१.४, परभणी ४१.७, अकोला ४२.१, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ४१.४, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.२, वर्धा ४१.५, वाशीम ४२.२, यवतमाळ ४१.५.

- उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४३.२, बीड ४३.२, जळगाव ४२.८, सोलापूर ४२.६, धुळे ४२.५, वाशीम ४२.२, अकोला ४२.१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT