Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert : वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

Maharashtra Storm Warning : राज्यात पावसाला पोषक हवामान असून सकाळपासूनच ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. आज (ता. २७) राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान असून सकाळपासूनच ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. आज (ता. २७) राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्‍चिमी चक्रावात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत, पावसाला पोषक हवामान झाले आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. गुरुवारी (ता. २६) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडी गायब झाल्याने गुरुवारी (ता. २६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १३.४ अंश तापमान नोंदले गेले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सकाळी उशिरापर्यंत धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. आज (ता. २७) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट)

नंदुरबार, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

गुरुवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.७ (१७.४), अहिल्यानगर २९.९ (१८.४), धुळे २८.५ (१३.४), जळगाव २९.७ (१९.३), जेऊर ३१.५ (१७), कोल्हापूर २८.३ (१९.४), महाबळेश्‍वर २३.६ (१५.९), मालेगाव २७ (१७.२), नाशिक २९.४ (१७.६), निफाड २८.२ (१५), सांगली ३०.७ (२०), सातारा २९.७ (१९), सोलापूर ३२.४ (२०.७), सांताक्रूझ २९.८ (१९.१), डहाणू २६.२ (१८.७), रत्नागिरी ३०.७ (२०.४), छत्रपती संभाजीनगर २९.४ (१८.६),

धाराशिव २९.२ (१७.८), परभणी ३०.२ (१८.६), परभणी कृषी विद्यापीठ २९.५ (१६), अकोला ३१.८ (१९.१), अमरावती ३०.४ (१६.३), भंडारा २९.४ (१६.४), बुलडाणा ३०.४ (१९), ब्रह्मपुरी ३१.८ (१६.५), चंद्रपूर २९.२, गडचिरोली २८ (१८), गोंदिया २९.२ (१५.८), नागपूर ३०.४ (१६.५), वर्धा २९.५ (१६), वाशीम ३०.४ (१९.६), यवतमाळ ३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT