Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

IMD Rain Forecast: आज (ता. १७) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाने उघडीप दिल्याने विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तीशी पार आहे. राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. १७) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर आणखी एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील कमी दाबाचे केंद्र, ग्वालिअर, उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे केंद्र, पुरुलिया ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, रोहा आणि ताम्हिणी येथे राज्यातील उच्चांकी २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाची उघडीप असल्याने विदर्भात कमाल तापमान तापदायक ठरत आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश तापमान नोंदले गेले. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १७) मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२६.६---२२.४

अहिल्यानगर---२८.०---२२.४

‎‎धुळे---३२.०---२०.८

जळगाव---३१.४---२३.७

जेऊर---३२.०---२०.०

‎‎कोल्हापूर---२५.६---२२.५

‎महाबळेश्‍वर---१९.२---१८.०

मालेगाव---३१.८---२१.६

‎‎नाशिक---२९.१---२२.९

‎निफाड---२९.७---२२.७

‎सांगली---२८.२---२२.७

‎सातारा---२५.६---२२.०

‎सोलापूर---३२.२---२३.६

‎सांताक्रूझ---२९.६---२६.८

डहाणू---३३.०---२६.३

रत्नागिरी---२७.६---२५.६

‎छत्रपती संभाजीनगर---३०.६---२२.८

‎धाराशिव---३०.५---२१.२

‎परभणी---३३.१---२५.२

परभणी (कृषी)---३२.९---२४.९

‎‎अकोला---३३.९---२५.०

अमरावती---३३.६---२३.६

‎भंडारा---३३.०---२२.०‎‎

बुलडाणा---३०.८---२३.२

‎ब्रह्मपुरी---३५.९---२५.९

‎चंद्रपूर---३५.२---२५.४

‎गडचिरोली---३२.४---२४.८

‎गोंदिया---३३.६---२३.६

‎नागपूर---३४.४---२५.६

‎वर्धा---३४.९---२५.५

‎वाशीम---३४.९---२५.५

‎यवतमाळ---३१.४---२४.४

‎विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT