Rain Agrowon
हवामान

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १६) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तिशी पार पोहोचला आहे. कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १६) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे.

उत्तर झारखंड, दक्षिण बिहार आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, तीव्र कमी दाबाचे केंद्र, हमीरपूर, झारखंडमधील कमी दाबाचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

मंगळवारी (ता. १५) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींनी हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे. नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश तापमानाची नोंदले गेले. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूप येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १६) बुलडाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १५) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.४---२२.३

अहिल्यानगर---२९.८---२२.५

‎‎धुळे---३२.०---२०.८

जळगाव---३०.८---२३.८

जेऊर---३३.५---२०.५

‎‎कोल्हापूर---२७.४---२१.९

‎महाबळेश्‍वर---१९.७---१७.५

मालेगाव---३१.०---२१.६

‎‎नाशिक---२८.३---२२.२

‎निफाड---२९.५---२१.९

‎सांगली---२९.०---२२.३

‎सातारा---२७.७---२२.१

‎सोलापूर---३४.४---२३.६

‎सांताक्रूझ---२९.६---२४.९

डहाणू---३१.१---२५.६

‎रत्नागिरी---३०.०---२४.३

‎छत्रपती संभाजीनगर---३१.१---२३.०

‎धाराशिव---३१.८---२१.४

‎परभणी---३३.२---२४.२

परभणी (कृषी)---३३.२---२४.२

‎‎अकोला---३३.६---२६.०

अमरावती---३३.४---२३.५

‎भंडारा---३४.०---२२.०‎‎

बुलडाणा---२९.२---२३.०

‎ब्रह्मपुरी---३५.०---२६.०

‎चंद्रपूर---३५.०---२५.०

‎गडचिरोली---३३.०---२४.६

‎गोंदिया---३३.४---२४.४

‎नागपूर---३५.२---२५.८

‎वर्धा---३४.०---२५.८

‎वाशीम---३१.२---२३.२

‎यवतमाळ---३१.४---२४.०

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT