Weather Update Agrowon
हवामान

Weather News : राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Weather Update : वादळी पावसाचा इशारा कायम

Team Agrowon

Pune News : राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. जळगाव येथे कमाल तापमान पुन्हा ४४ अंशांच्या पार गेले आहे. आज (ता. २१) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ४३.२ अंश आणि ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. आज (ता. २२) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३८.७, धुळे ४२.०, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३६.४, महाबळेश्वर २९.५, नाशिक ४०.३, निफाड ३९.८, सांगली ३६.८, सातारा ३८.७, सोलापूर ३८.२, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३६.१, रत्नागिरी ३३.६, छत्रपती संभाजीनगर ४०.०, नांदेड ३७.२, धाराशिव ३९.८, परभणी ३९.६, अकोला ४३.२, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.८, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४१.२, गडचिरोली ३६.६, गोंदिया ३८.४, नागपूर ३८.६, वर्धा ४१.५, वाशीम ३९.६, यवतमाळ ४१.५.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, मालदीव आणि कोमोरिन भागात रविवारी (ता. १९) दाखल झाले आहे. बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता वाढणार आहे. यातच वायव्य उत्तर प्रदेशात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, रायगड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

जळगाव ४४.२, अकोला ४३.२, ब्रह्मपुरी ४२.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT