Weather  Agrowon
हवामान

Rain In Maharashtra : पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज आला, शुक्रवार आणि शनिवार पावसाचा येलो अलर्ट!

Rain Forecast : मध्यप्रदेश आणि उत्तरमधील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवर मंगळवारी तयार झालेला कमी दबाचा पट्टा निवळून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशकडे सरकला आहे. त्यामुळं मध्यप्रदेश आणि उत्तरमधील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर बुधवार आणि गुरुवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसह मुख्यत; उघडीप राहण्याचा अंदाज आहे. परंतु शुक्रवारीपासून काही जिल्ह्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या काही भागात कापणीची काम सुरू झाली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. 

शुक्रवारी राज्यातील जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

शनिवारी मात्र जळगाव, अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा येलो अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

तसेच शनिवारी कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

खरीप पीक कापणीला आले आहेत. मागील आठवडाभर पावसानं उघडीप दिल्यानं काही भागात काढणीच्या कामांनी वेग घेतला. मात्र पुढील शुक्रवारी आणि शनिवारी बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकर कापणीची कामं उरकून घ्यावी. तसेच कापलेल्या पिकांची व्यवस्थित गंजी घालून भिजणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन तज्ञानी केलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT