Summer Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: तापमानाचा पारा चढला! उष्णतेच्या झळा अधिक तीव्र

Summer Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून, अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांवर पोहोचले आहे. सांताक्रूझ येथे तब्बल ३८.४ अंश तापमानाची नोंद झाली असून, येत्या काही दिवसांत तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकणात आलेली उष्णतेची लाट काहीशी ओसरली असली, तरी राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांपार पोहोचला आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३८.४ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. १) राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुरुवारी (ता. २७) केरळातील कन्नूर विमानतळ येथे देशातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील सांताक्रूझ पाठोपाठ येथे अकोला येथे ३८ अंश तापमान नोंदले गेले.

तर ब्रह्मपुरी, डहाणू, धुळे येथे तापमानाचा पारा ३६ अंशांपार होता. किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली किंवा तापमान ३७.५ अंशांच्या पुढे गेल्याने सांताक्रूझ येथे उष्णतेची लाट कायम होती.

दरम्यान, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, मालेगाव, जळगाव, सांगली, भंडारा, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत असून, उकाड्याने घामाच्या धारा कायम आहेत. आज (ता.१) राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.२---१७.१

अहिल्यानगर---३४.९---१४.७

धुळे---३७---१२

जळगाव---३६.२---१६

जेऊर---३५.५---१७

कोल्हापूर---३४.२---२०.७

महाबळेश्वर---३०---१७.८

मालेगाव---३६.४---१८.६

नाशिक---३६---१७.१

निफाड---३३.७---१३.३

सांगली---३६.२---१९.९

सातारा---३५.२---१७.६

सोलापूर---३६.९---२३.१

सांताक्रूझ---३८.४---२२.८

डहाणू---३७.२---२०.६

रत्नागिरी---३६.६---२१.५

छत्रपती संभाजीनगर---३५.०---१७.७

धाराशिव---३४.५---१९

परभणी---३५.२---१९.९

परभणी (कृषी)---३४.५---१५.२

अकोला---३८---१९.५

अमरावती---३६.२---१७.९

भंडारा---३६.५---२१.४

बुलडाणा---३६.५---२१.४

ब्रह्मपुरी---३७.३---१६

चंद्रपूर---३६.२---निरंक

गडचिरोली---३५---१६.६

गोंदिया---३४---१६.५

नागपूर---३५.४---१५.८

वर्धा---३५.१---१६.९

वाशीम---३५.८---निरंक

यवतमाळ---३६.२---२२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१५.८---३८

मराठवाडा---१५.२---३५.२

पश्‍चिम महाराष्ट्र---१७---३६.९

उत्तर महाराष्ट्र---१२---३७

कोकण---२०.६---३८.४

७ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सांताक्रूझ ३८.४, अकोला ३८, ब्रह्मपुरी ३७.३, डहाणू ३७.२, धुळे ३७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT