Winter Season Agrowon
हवामान

Hawaman Andaj : राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा कडका राहणार: राज्यातील बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमानात घट

Weather Forecast : राज्यातील थंडी या आठवड्यात कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या थंडी वाढली आहे. किमान तापमानाचा पारा कमी होत आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात यंदाच्या निचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील थंडी या आठवड्यात कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

राज्यात किमान आणि कमाल तापमात घट झाली आहे. त्यामुळे राज्याला हुडहूडी भरली. परभणी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात यंदाच्या निचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथली गहू संशोधन केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस तापमान होते.

तर या आठड्यात राज्यात थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. उत्तर भारतातून उत्तर दिशेने येणारे थंड वारे राज्यात प्रवेश करताना ताशी २५ ते ३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या पूर्वीय वाऱ्यात मिसळून महाराष्ट्रात लोटले जात आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रात सध्या जाणवत असलेल्या थंडीचे सातत्य अजूनही पुढील पाच दिवस म्हणजे रविवारपर्यंत असेच टिकून राहणार आहे. सध्य:स्थितीतील थंडीत कदाचित किंचित अधिक वाढही होऊ शकते, असा अंदाज श्री. खुळे यांनी व्यक्त केला.

सध्या मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. ही दोन्हीही तापमाने भागानुसार सरासरीपेक्षा दोन चार अंशाने खालावलेले आहेत.

त्यातही नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि अकोला ह्या जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा १० ते १३ अंशापर्यंत घसरला आहे. मुंबईसह कोकणातील कमाल तापमान मात्र ३० अंशाच्या आसपास आहे, असे खुळे यांनी सांगितले.

कन्याकुमारीजवळील हवेच्या कमी दाबाचे जास्तीत जास्त अतितीव्र कमी दाबापर्यंत विकसनाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चक्रीवादळ वा पावसाची भिती बाळगू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT