Cold Weather Update Agrowon
हवामान

Cold Weather Update : गुलाबी थंडीची राज्याला प्रतीक्षा

Winter Season : राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात गारठा कमी झाला असून, गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत शुक्रवारी (ता. १०) दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.

आज (ता. १२) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात गारठा कमी झाला असून, गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे.

पश्चिम - मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढेल.

ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. उकाडा कायम आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. ११) राज्यातील ढगाळ हवामान निवळून आकाश निरभ्र झाले आहे.

यवतमाळ येथे नीचांकी १६.५ अंश तापमान

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात कमाल तापमान ३० ते ३६ अंशाच्या दरम्यान आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असून, पारा १६ अंशांच्या पुढे आहे. शनिवारी (ता. ११) यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.८ (१९.२), जळगाव ३५.२ (१७.२), कोल्हापूर २८.७ (२२.६), महाबळेश्वर २४.६ (१७.५), नाशिक ३२.५ (१९.४), निफाड ३२.६ (१८.०), सांगली २८.५ (२२.५), सातारा २९.३ (२१.४), सोलापूर ३२.५ (२२.४), सांताक्रूझ ३५.७ (२४.८), डहाणू ३४.० (२३.६), रत्नागिरी ३३.२ (२५.४),

छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१७.०), नांदेड ३२.६ (२१.०), परभणी ३०.० (१९.४), अकोला ३५.४ (१९.४), अमरावती ३३.८ (१८.५), बुलडाणा ३४.० (१९.३), ब्रह्मपुरी ३३.३(१९.६), चंद्रपूर ३१.४(१७.४), गडचिरोली ३२.० (१६.६), गोंदिया ३३.० (१६.८), नागपूर ३३.०(१७.८), वर्धा ३२.९(१८.५), वाशीम ३३.६(१८.६) यवतमाळ ३४.५ (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT