Winter Weather Agrowon
हवामान

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Winter Weather Forecast : तापमानातील घट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढली आहे. राज्यातील बहुतांशी भागात हुडहुडी वाढली आहे. आज निफाड येथे सर्वात कमी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानातील घट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत आहे.

आज हरियानातील हिस्सार आणि राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही गारठा वाढत आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.५ अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा खाली आले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाला आहे.

रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.७ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात घट कायम राहून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT