Rain Agrowon
हवामान

Monsoon Return : माॅन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने

Monsoon Back : माॅन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरु आहे. माॅन्सूनने आज महाराष्ट्रासह देशातील इतर भागातून माघार घेतली आहे. देशात काही भागात सध्या पाऊस हजेरी लावत आहे

Anil Jadhao 

Rain Alert : माॅन्सूनने देशातील आणखी काही भागांमधून काढता पाय घेतला. माॅन्सूनने आज पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशच्या सर्व भागातून माॅन्सून परतला. तर बिहारचा आणखी काही भाग, झारखंड, छत्तसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी भागातून माॅन्सूनने माघार घेतली आहे. तर महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून माॅन्सून परतला.

आज माॅन्सून कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात होता. माॅन्सूनच्या परतीची सिमा दौलतगंज, कांकेर, रामागुंडम, बिजापूर आणि वेंगुर्ला या भागात होती. देशातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि हिमालयाच्या शेजारच्या भागात पाऊस पडत आहे.

राज्याचा विचार करता सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. ऑक्टोबर हीटचा अनुभव मागील काही दिवसांपासून येत आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज नसल्याचे सांगितले. राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे, असेही हवामान विभागाने जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT