Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon 2024 : अखेर माॅन्सून आठवड्यानंतर पुढे सरकला; राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. तर राज्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : आठ दिवसांच्या मुक्कामानंतर शेवटी माॅन्सूनने आज राज्यासह देशाच्या इतर काही भागात प्रगती केली. माॅन्सून आज विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात पुढे सरकरला. तसेच माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. तर राज्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

पोषक हवामान नसल्याने गेले आठ दिवस माॅन्सून एकाच जागेवर ठाण मांडून होता. पण आज माॅन्सून पुढे सरकला. माॅन्सूनने आज महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली. 

माॅन्सूनची सिमा आज अमरावती, गोंदीया, दूर्ग, रामपूर, मालदा, भागलपूर आणि राक्सौल भागात होती. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, नैऋत्य बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवसांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज दिला. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर पुणे आणि सातारा तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट काही भागांसाठी दिला आहे. शनिवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT