Maharashtra Weather  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Rain Forecast : राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने किमान तापमानात वाढही झाली.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने किमान तापमानात वाढही झाली. शनिवारपासून (ता. १६) राज्यात पावसाची उघडीप मिळणार असून, किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मन्नारचे आखात आणि श्रीलंका किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून कोमोरिन भागापासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शनिवारी (ता. १६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.६ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे किमान तापमान १५ अंशांवर होते. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

राज्याच्या कमाल तापमानातही हळूहळू घट होत असल्याचे दिसून येत आहे. कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या खाली आला असून, शनिवारी (ता. १६) वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. आज (ता. १७) राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.७ (२०.५), अहिल्यानगर ३०.९ (१९.७), धुळे - (१३.६), जळगाव ३३ (१७.३), कोल्हापूर २९.१ (२२.३), महाबळेश्‍वर २२.६ (१६.५), नाशिक ३१.७ (१६.८), निफाड ३० (१५.७), सांगली ३० (२२.२), सातारा २९.७ (२१.७), सोलापूर ३३ (२२.६), सांताक्रूझ ३३.६ (२३.२), डहाणू ३३.९ (२२.९), रत्नागिरी ३३.७ (२५.५),

छत्रपती संभाजीनगर ३१.४ (१७.४), धाराशिव - (२०.८), परभणी ३२.३ (१७.९), परभणी कृषी विद्यापीठ ३२.२ (१६.५), अकोला ३३.५ (१८), अमरावती ३३.६ (१६.५), बुलढाणा ३१.३ (१७.८), ब्रह्मपुरी ३३.८ (१५), चंद्रपूर ३०.८ (१५.५), गडचिरोली ३१.४ (१५.४), गोंदिया ३०.४ (१४.२), नागपूर ३१.६ (१५.९), वर्धा ३१.५ (१५.९), वाशीम ३४.६ (-), यवतमाळ ३२.२ (१६.५).

१५ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे १३.६, ब्रह्मपुरी १५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT