Maharashtra Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : किमान तापमानाचा पारा घसरला

Maharashtra Weather Forecast : पावसाळी वातावरण निवळताच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे. परिणामी राज्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे

अमोल कुटे

Pune News : पावसाळी वातावरण निवळताच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे. परिणामी राज्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. राज्यात थंडी वाढू लागली असून, किमान तापमान ११ अशांपर्यंत घसरले आहे. आजपासून (ता. १९) राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोमोरिन भाग आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, उत्तर भारतात आकाश निरभ्र होत थंडी वाढू लागली आहे. सोमवारी (ता. १८) दिल्ली येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा खाली आले आहे. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे.

कोकण आणि राज्याचा दक्षिण भाग वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १९) किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.२ (१४.५), अहिल्यानगर ३१ (१२.६), धुळे (११), जळगाव ३२.८ (१३.२), कोल्हापूर ३०.३ (१९.७), महाबळेश्वर २४.५ (१३.४), नाशिक ३१.३ (१५.२), निफाड ३०.४ (१२.७), सांगली ३१.९ (१८.७), सातारा ३०.७ (१६.८), सोलापूर ३४.४ (१६.८), सांताक्रूझ ३५.८ (२३.९), डहाणू ३४.३ (२१.२), रत्नागिरी ३५.८ (२३.९), छत्रपती संभाजीनगर ३१.८ (१४.४),

धाराशिव (१६.१), नांदेड (१४.२), परभणी ३१.४ (१४.५), परभणी कृषी विद्यापीठ ३०.८ (११.३), अकोला ३३ (१५.५), अमरावती ३२ (१५.४), बुलडाणा ३०.४ (१५.५), ब्रह्मपुरी ३२.८ (१५), चंद्रपूर ३०.४ (१५.८), गडचिरोली ३१.२ (१५.२), गोंदिया २९.६ (१४.३), नागपूर ३०.९ (१५.६), वर्धा ३० (१५.६), वाशीम ३४.४ , यवतमाळ (१६).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

Livestock Breeding Policy: महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण : क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना

Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

SCROLL FOR NEXT