Summer Heat Agrowon
हवामान

El Nino : मे अखेरपर्यंत ‘एल निनो’चा प्रभाव कायम

Weather Update : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ आतापर्यंतच्या पाच सर्वांत तीव्र ‘एल निनो’ पैकी एक ठरला आहे.

Team Agrowon

Weather Update : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ आतापर्यंतच्या पाच सर्वांत तीव्र ‘एल निनो’ पैकी एक ठरला आहे. ‘एल निनो’ निवळू लागला असला तरी, मार्च ते मेमध्ये त्याचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे जगभरात जमिनीवरील तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता जागतिक हवामान संस्थेने वर्तविली आहे. ‘एल निनो’ निवळत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीपेक्षा चांगल्या पावसाचे संकेत आहेत.

२०२३ हे आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले असून, अनेक वर्षभरात तापमानासह अनेक तीव्र हवामान घटनांची नोंद झाली आहे. यातच गतवर्षी सक्रिय झालेला ‘एल निनो’ मार्च ते मे मध्ये टिकून राहण्याची शक्यता ६० टक्के आहे.

तर एप्रिल ते जूनमध्ये ‘एल निनो’ स्थिती निवळून, प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसमान्य स्थितीत येण्याची शक्यता ८० टक्के आहे. तर त्यानंतर हळूहळू ‘ला निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता असल्याचे जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जून २०२३ मध्ये ‘एल निनो’ स्थिती तयार झाली. नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान ही स्थिती तीव्र झाली. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १९९१ ते २०२० त्या सरासरीपेक्षा २ अंशांनी अधिक असल्याचे दिसून आले. १९९७-९८ आणि २०१५-१६ चे ‘एल निनो’ सर्वांत तीव्र होते.

यावर्षीचा ‘एल निनो’ त्यामानाने कमकुवत ठरला आहे. सध्या ‘एल निनो’ कमकुवत होत असला तरी समुद्राच्या पृष्ठभागाचे पुढील तीन महिने तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, जगभरातील प्रादेशिक पाऊसमानावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

पूर्व मध्य प्रशांत महासागरामध्ये दोन ते सात वर्षांत ‘एल निनो’ स्थिती तयार होते. ही स्थिती १२ महिन्यांपर्यंत टिकून राहते. या काळात अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत पाऊस वाढतो तर आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियात उष्ण स्थिती असते. ‘एल निनो’ तयार झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीदेखील जागतिक हवामानावर परिणाम होते, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.

हरितगृह वायूदेखील कारणीभूत

जागतिक हवामान संस्थेच्या सरचिटणीस केलेस्टे साऊलो म्हणाल्या, की जून २०२३ पासून प्रत्येक महिन्यात तापमानाने नवीन उच्चांक नोंदविला आहे. ‘एल निनो’मुळे जागतिक तापमान वाढ झाली असली तरी मुख्यतः हरितगृह वायूदेखील तापमान वाढीला कारणीभूत आहेत.

विषुववृत्तीय पॅसिफिकमधील महासागराच्या पृष्ठभागाचे तापमानामुळे ‘एल निनो’ स्थिती निर्माण होत असली तरी जगभरातील समुद्र-पृष्ठभागाचे तापमान गेल्या १० महिन्यांपासून सातत्याने अधिक असल्याचे दिसून आले आहे.

जानेवारी २०२४ मध्ये समुद्र-पृष्ठभागाचे तापमान आतापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी पातळीवर होते. ही स्थिती चिंताजनक असून, केवळ ‘एल निनो’मुळे हे स्पष्ट होऊ शकत नाही, असेही साऊलो यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT