Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : थंडीच्या लाटेने महाराष्ट्र गारठला

Maharashtra Weather Forecast : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्याच्या काही भागांत थंडीची लाट आली आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्याच्या काही भागांत थंडीची लाट आली आहे. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून राहण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असली तरी राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागला आहे. गुरुवारी (ता. २८) मध्य प्रदेशमधील ‘मंडला'' येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे नीचांकी ८ अंश तापमान नोंदविले गेले. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पुणे आणि अहिल्यानगर येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

दरम्यान गुरुवारी (ता.२८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे येथे थंडीची लाट येणार असल्याने सतर्कतेचा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उद्यापासून (ता. ३०) राज्यात किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता असली तरी, गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २८.४ (९.८), अहिल्यानगर २८ (९.५), धुळे २९ (८), जळगाव ३०.२ (११.२), कोल्हापूर २८.८ (१५.१), महाबळेश्वर २४.८ (१५.१), मालेगाव २७ (१२.६), नाशिक २७ (१२.६), निफाड २७.८ (८), सांगली ३० (१४.९), सातारा २९.२ (१२.५), सोलापूर ३१ (१४.६), सांताक्रूझ ३३.५ (१८.७), डहाणू ३२.१ (१७.३), रत्नागिरी ३४ (२०.२), छत्रपती संभाजीनगर २८.४ (११.६), धाराशिव २८.१ (१२.४), परभणी २८.५(११.५), परभणी कृषी विद्यापीठ २८.६ (९.६), अकोला ३०.८ (१२.८), अमरावती ३०.८ (१४.९), भंडारा २८.४ (१४), बुलडाणा २८ (१३.३), ब्रह्मपुरी ३१.८ (११), चंद्रपूर २९.८ (१४), गडचिरोली २९.४ (१३), गोंदिया २८.६ (११.४), नागपूर ३०.४ (११.८), वर्धा २९ (१२.४), वाशीम २९ (-), यवतमाळ २९ (-).

बंगालच्या उपसागरात घोंघावणार चक्रीवादळ

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) तीव्रता वाढत आहे. गुरुवारी (ता. २८) ही प्रणाली पुदुच्चेरीपासून ४१० किलोमीटर, चेन्नईपासून ४८० किलोमीटर आग्नेयेकडे होती. आज (ता. २९) सकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता आहे. ही चक्रीवादळ प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याची अंदाज आहे.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ८.०, निफाड ८.०, अहिल्यानगर ९.५, परभणी (कृषी) ९.६, पुणे ९.८,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT