Maharashtra Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढला

Maharashtra Weather Update : राज्यात दोन दिवस गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी (ता. १४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ४.४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात दोन दिवस गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली आज (ता.१५) विरून जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज (ता. १५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याने शनिवारी (ता. १४) पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही गारठा वाढला असून, धुळे येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा ५ अंशांच्या खाली आला असून, अनेक ठिकाणी तापमान १० अंशांपेक्षा कमी झाले आहे. शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश तापमानाची नोंद झाली.

धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील निफाड, जळगाव, अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. राज्यात दोन दिवस गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शनिवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.७ (१०.१), अहिल्यानगर २८.२ (८.७), धुळे २६.५ (४.४), जळगाव २६.८ (८.४), जेऊर ३० (९), कोल्हापूर २९.५ (१७), महाबळेश्‍वर २४.८ (११.७), मालेगाव २५ (१०), नाशिक २५.९ (९.२), निफाड २४.८ (७.२), सांगली ३०.६ (१५.५), सातारा ३०.१ (१२.६), सोलापूर ३२.४ (१५.४), सांताक्रूझ ३३.४ (२०.१), डहाणू ३१.८ (१६.०), रत्नागिरी ३४.७ (२०.६), छत्रपती संभाजीनगर २८.६ (१०.६), धाराशिव २९.३ (१३.२),

नांदेड - (१०.६), परभणी २८ (९.८), परभणी कृषी विद्यापीठ २७.२ (७.८), अकोला २९.२ (१०.६), अमरावती २८.४ (१२.३), भंडारा २६.२ (११), बुलडाणा २५.४ (१०.६), ब्रह्मपुरी २८.८ (१०.६), चंद्रपूर २७.८ (११), गडचिरोली २७.२ (१०.४), गोंदिया २६.२ (८.८), नागपूर २९ (९.४), वर्धा २८.२ (८.९), वाशीम २७.९ (११.२), यवतमाळ २७.५ (-).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ४.४, निफाड ७.२, परभणी (कृषी) ७.८, जळगाव ८.४, अहिल्यानगर ८.७, गोंदिया ८.८, वर्धा ८.९, जेऊर ९, नागपूर ९.४, नाशिक ९.२, परभणी ९.८, मालेगाव १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT