Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : पारा पुन्हा ४२ अंशांपार

Weather News : राज्यात उद्यापासून पावसाला पोषक हवामान

Team Agrowon


Weather Forcasting : पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी, मध्य महाराष्ट्रातील जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे पारा ४२ अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. ४) राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. ५) राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात सध्या निरभ्र आकाश असून, दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. रात्री देखील उष्ण ठरत असून, उकाडा टिकून राहत आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढत असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बुहतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वरच आहे. आज (ता. ४) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

बुधवार (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३९.२, नगर ३८.९, धुळे ४०.०, जळगाव ४०.२, जेऊर ४२.०, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.०, नाशिक ३८.२, निफाड ३७.८, सांगली ४०.५, सातारा ३९.२, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३२.९, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३२.७, छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ४०.७, नांदेड ४०.२, परभणी ४०.५, अकोला ४१.८, अमरावती ४०.८, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ४२.३, चंद्रपूर ४१.२, गडचिरोली ४०.६, गोंदिया ३९.८, नागपूर ४१.२, वर्धा ४१.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४१.२.

मराठवाड्यासह धुळे, नंदूरबार
जिल्ह्यात पावसाची शक्यता

उद्यापासून उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
ब्रह्मपुरी ४२.३, जेऊर ४२, मालेगाव ४२, सोलापूर ४२, अकोला ४१.८, वर्धा ४१.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४१.२, चंद्रपूर ४१.२, नागपूर ४१.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Weighing: ऊस वजनात तफावत; खासगी काट्यावरील वजन ग्राह्य, काय आहे नियम?

Sustainable Farming: भूमी पूजन, सुपोषणाचा संकल्पातून शाश्वत शेतीकडे वाटचालीचा संदेश

Jal Mahotsav: ‘जल महोत्सवा’द्वारे पाणी बचतीचा जागर

Daytime Electricity: शेतीपंपांना दिवसा सुरळीत वीज द्या

Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू

SCROLL FOR NEXT