Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील तापमानात घट, गारठा वाढतोय

Maharashtra Weather Forecast : आज (ता. २१) तापमानातील घट कायम राहणार असून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली असून, निफाड आणि धुळे येथे किमान तापमानाचा पारा ११ अशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. २१) तापमानातील घट कायम राहणार असून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडी कमी-अधिक होत आहे. राज्यातही गारठा वाढत असून, बुधवारी (ता. २०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.३ अंश तापमानाची नोंद झाली.

यातच अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा खाली आले आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २०) किमान तापमानात घट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.४ (१२.२), अहिल्यानगर २९.८ , जळगाव ३१.६ (१३.२), कोल्हापूर २९.२ (१७.२), महाबळेश्‍वर २५.८ (१३.२), मालेगाव २७.८ (१४.८), नाशिक २९ (१२.४), निफाड २८.४ (१०.३), सांगली ३०.५ (१५.८), सातारा ३०.२ (१४.५), सोलापूर ३२.४ (१७.४), सांताक्रूझ ३० (२०.२), डहाणू ३१.९ (१९), रत्नागिरी ३५ (२२), छत्रपती संभाजीनगर २९.४ (१४), धाराशिव २९.४ (१४.८), परभणी २९.८ (१३.६), परभणी कृषी विद्यापीठ २९.५ (१०.५), अकोला ३१.८ (१५.४), अमरावती ३१.४ (१५.३), बुलडाणा ३०, ब्रह्मपुरी ३२.२ (१४.२), चंद्रपूर ३० (१४), गडचिरोली ३०.२ (१४), गोंदिया २९.२ (१३.५), नागपूर ३०.४ (१३.६), वर्धा ३० (१५), यवतमाळ ३१.५.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

दक्षिण अंदमान समुद्रात आज (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Export: निर्यात अन् उत्पन्नवृद्धीचा रोडमॅप

Moong Production: सुधारित वाण, तंत्रातून मुगाचे वाढले उत्पादन

Bacchu Kadu: अन्यथा निकृष्ट बियाणे कंपन्यांची कार्यालये जाळू: बच्चू कडू

Defective Soybean Seeds Issue: निकृष्ट सोयाबीन बियाणेप्रकरणी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

Grassland Conservation: सडेपठार संवर्धनातून आदिवासी भागात दुग्धोत्पादनाला चालना

SCROLL FOR NEXT