Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : एप्रिल, जूनमध्ये तापमान सरासरी राहण्याचा अंदाज

यंदाच्या उन्हाळा हंगामात (एप्रिल ते जून) महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : यंदाच्या उन्हाळा हंगामात (एप्रिल ते जून) महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात कमाल तापमान (Minimum Temperature) सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह, पश्चिम विदर्भात तापमान सरासरी इतके राहणार आहे. तर पूर्व विदर्भ, कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटा (Heat Wave) येण्याचा इशाराही हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज शनिवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला.

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताचा भाग वगळता उर्वरित देशात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

तर देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता अधिक आहे. एप्रिल महिन्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील भाग, उत्तर छत्तीसगड, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब हरियाना राज्यात तीव्र उष्ण लाटेची शक्यता आहे.

ला-निना स्थिती निवळली

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात असलेली ला-निना स्थिती निवळली आहे. महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसामान्य स्थितीत आहे. पुढील काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याची शक्यता आहे.

हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) सध्या सर्वसामान्य आहे. उन्हाळा हंगामात ही स्थिती सर्वसामान्य राहण्याचा अंदाज आहे.

एप्रिलमध्ये उष्ण लाट शक्य

एप्रिल महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

तर एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT