Weather  Agrowon
हवामान

Cold Wave : पंजाबमधील आदमपूरमध्ये 0.4 अंश तापमान; राज्यातही गारठा कायम; आज धुळे येथे नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद....

Weather Forecast : राज्यात गारठा कायम राहणार असला तरी, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच शून्य अंशांच्या खाली घसरला आहे. राज्यातही गारठा कायम असून, आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याच्या नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला तरी, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

यातच पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. पंजाबच्या 'अदमपूर' येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे ०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश तापमानाची नोंद झाली. दिवसभर वाऱ्यांमुळे थंडी जाणवत असून, सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे.

धुळ्यासह परभणी (कृषी), जळगाव, गडचिरोली येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला तरी दोन दिवसांत किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT