Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave Alert: उन्हाचा पारा ३७ अंशावर; कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Weather Forecast: राज्यात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३६ अंशावर पोहचला आहे. तर किमान तापमान १६ अंशांवर पोहचलं आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. तसेच घामटा निघत आहे.

Dhananjay Sanap

Pune News: थंडीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३६ अंशावर पोहचला आहे. तर किमान तापमान १६ अंशांवर पोहचलं आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. तसेच घामटा निघत आहे.

राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह कमाल आणि किमान तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. विदर्भातील ब्रम्हपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर नाशिक येथे १४.७ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने पिकांची काळजी घेण्याचा सल्ला कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. 

उत्तर पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरच्या लगतच्या भागात पश्चिमी चक्रावाताची निर्मिती झाली आहे. तसेच आसाम आणि लगतच्या प्रदेशात कमी दाब क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अरुणाचल आणि ईशान्य आसाममध्ये पावसाची शक्यता आहे. मागील चोवीस तासात राजस्थान येथील सिकार येथे देशाच्या सपाट भुभागावरील निच्चांकी ३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

राज्यातील बहुतांश भागात पुढील ४ ते ५ दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात पुढील २४ तासांनंतर २ ते ३ अंशाने वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

निरभ्र आकाश आणि  स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे पुढील २४ तासात राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान १९ अंशांवर राहील. तर पुढील दोन दिवसांत बहुतांश भागात कमाल तापमान ३६ आणि किमान तापमान २१ अंशावर पोहचण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT