Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Update : तापमानात चढ उतार सुरुच; उत्तर भारतातून थंडी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे थंडी वाढणार

Winter Weather Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली आहे. मात्र थंडीचा कडाका अजूनही कमी दिसत आहे. राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या खाली दिसत आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली आहे. मात्र थंडीचा कडाका अजूनही कमी दिसत आहे. राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या खाली दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी आणखी कमी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील भागात हलक्या पाऊस पडत आहे. तर हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी दिसत आहे.

आज राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. 

राज्यातही काही भागातील किमान तापमान १० अंशाच्या खाली दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा कमी होत आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव येथे झाली होती.

जळगावात ८.२ अंश सेल्सिअस तापमान होते. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९ अंशाची नोंद झाली. राज्यातील थंडी वाढत असली तरी तापमानात काही प्रमाणात चढ उतार दिसत आहे. पण राज्यातील तापमानात आणखी २ ते ३ अंशाने घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT