Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather : तापमानाचा पारा खाली

Weather Update : आज (ता. १९) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानात वाढ-घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

IMD Report : उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे, तर विदर्भासह राज्यात किमान तापमानाचा पारा खाली येऊ लागला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही घट होत आहे. आज (ता. १९) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानात वाढ-घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात ‘मिधिली’ चक्रीवादळ बांगलादेशच्या खेपुपराजवळ जमिनीवर आले. हे चक्रीवादळ निवळले असून, उत्तर त्रिपुरा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. श्रीलंकेजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यापासून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा खाली आला आहे. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा २९ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

निफाड येथे नीचांकी १२.४ अंश

किमान तापमानाचा पारा कमी-अधिक होत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, पुणे, जळगाव, गोंदिया, वाशीम येथे किमान तापमान १५ अंशाच्या खाली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.३ (१४.९), जळगाव ३१.६ (१४.९), कोल्हापूर ३०.२ (१९.५), महाबळेश्वर २६.८ (१५.९), नाशिक ३०.० (१४.२), निफाड २९.१ (१२.४), सांगली ३०.८ (१८.९), सातारा ३१.० (१६.०), सोलापूर ३३.६(१९.६), सांताक्रूझ ३४.८ (२२.४), डहाणू ३३.३ (२१.०), रत्नागिरी ३४.९ (२२.०), छत्रपती संभाजीनगर ३१.२ (१६.०), नांदेड ३१.४ (१८.६), परभणी ३१.० (१८.०), अकोला ३२.६ (१७.१), अमरावती ३१.६ (१७.४), बुलडाणा ३०.२ (१६.४), ब्रह्मपुरी ३३.७ (१७.६), चंद्रपूर ३१.२(१६.०), गडचिरोली ३०.६ (१५.६), गोंदिया ३०.५ (१४.८), नागपूर ३०.८(१५.१), वर्धा ३०.९(१६.९), वाशीम ३५.२(१६.०), यवतमाळ ३२.५ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT