Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : हिवाळ्यात निघतोय घाम

Maharashtra Weather Update : आज (ता. ७) दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात सध्या भर हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव मिळत असून, ढगाळ हवामानामुळे चांगलाच घाम निघत आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी झोडपून काढत आहेत. कोकणात उन्हाचा ताप अधिक असल्याने ठाणे येथे देशातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. ७) दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने शुक्रवारी (ता. ६) पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात मात्र पावसाला पोषक हवामान झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा झाला आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने बहुतांश ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पार गेले आहे. थंडीची चाहूल लागल्यानंतर अचानक पावसाळी हवामान होत वाढलेला चटका अधिक तापदायक वाटत आहे.

राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ आकाश झाले असून, बऱ्याच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या पुढे गेल्याने थंडी नाहीशी झाली आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ झाली आहे. ठाण्यासह सांताक्रूझ, रत्नागिरी, सोलापूर, ब्रह्मपुरी येथे तापमान ३५ अंशांपार गेले आहे.

शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. आज (ता. ७) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.७ (१९.८), अहिल्यानगर ३२.८ (२१.५), धुळे ३० (१७.५), जळगाव ३३ (१८), जेऊर ३१.५ (१८.५), कोल्हापूर ३१.६ (२२.७), महाबळेश्‍वर २६.५ (१७.५), मालेगाव २८.२ (२२.२), नाशिक ३१.३ (२०.९), निफाड ३०.५ (२१), सांगली ३२.३ (२२.२), सातारा ३१.६ (२०.२), सोलापूर ३५.४ (२३.६), सांताक्रूझ ३५.४ (२४.४),

डहाणू ३१.२ (२२.९), रत्नागिरी ३५ (२४.२), छत्रपती संभाजीनगर ३२.४ (२२), धाराशिव - (२०), परभणी ३२ (२०.५), परभणी कृषी विद्यापीठ ३१.७ (१९.४), अकोला ३३.१ (२३.४), अमरावती ३३.४ (२०.९), भंडारा ३२.४ (२०), बुलडाणा ३०.६ (२१.२), ब्रह्मपुरी ३५ (१९.९), चंद्रपूर ३२.६ (१७.२), गडचिरोली ३२ (१८), गोंदिया ३१.८ (१८.२), नागपूर ३२.५ (२०.६), वर्धा ३२ (२१), वाशीम ३१ (१९.६), यवतमाळ ३२.५ (-).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सातारा, सांगली, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT