Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढणार

Summer Heat : वादळी पावसाचे ढग दूर होताच राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाचे ढग दूर होताच राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा विस्तारला आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. कोमोरिन भागातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीपासून उत्तर कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश असून. आज (ता. १५) सोलापूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य भारतासह राज्याच्या काही भागाच्या कमाल तापमानात ४ ते ६ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.१, नगर ३९.०, धुळे ३८.०, जळगाव ३८.७, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्वर ३२.१, मालेगाव ४१.०, नाशिक ३७.७, निफाड ३६.२, सांगली ३८.५, सातारा ३७.९, सोलापूर ३७.७, सांताक्रूझ ३२.५, डहाणू ३३.३, रत्नागिरी ३२.४,

छत्रपती संभाजीनगर ३५.४, नांदेड ३२.२, परभणी ३२.९, अकोला ३६.२, अमरावती ३१.८, बुलढाणा ३५.६, ब्रह्मपूरी ३२.२, चंद्रपूर २९.२, गडचिरोली २६.४, गोंदिया ३१.८, नागपूर ३१.०, वर्धा ३०.९, वाशीम ३४.२, यवतमाळ ३०.५.

विजांसह पावसाचा अंदाज :

सोलापूर, बीड, धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

Totapuri Mango: तोतापुरी आंब्याला १५ हजारांचा दर

Rahul Gandhi Demands: धर्मेंद्र प्रधान यांनी युवकांची माफी मागत राजीनामा द्यावा : राहुल गांधी

Petrol Ethanol Blending: इथेनॉल मिश्रित पेट्रोल वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित

SCROLL FOR NEXT