Heat Wave  Agrowon
हवामान

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढणार

पावसाच्या हजेरी नंतर कमाल तापमानात घट झाली असून, पारा ३८ अंशांपर्यंत आला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : पावसाच्या हजेरी नंतर कमाल तापमानात (Temperature) घट झाली असून, पारा ३८ अंशांपर्यंत आला आहे. आजपासून (ता. २) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा (Dry Weather) अंदाज आहे.

तर राज्यात उन्हाचा (Summer Heat) चटका वाढून कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यात चाळीशीपार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे.

शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर आणि ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३१ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानात काहीशी घट झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा १२ ते २४ अंशांच्या दरम्यान होता.

मध्य उत्तर प्रदेशपासून तेलंगाना पर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. ओडिशापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

तसेच पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.८ (१५.५), जळगाव ३४.६ (१८.२), धुळे ३४.० (१३.४), कोल्हापूर ३३.२ (१९.७), महाबळेश्वर २८.५ (१४.०), नाशिक ३०.१ (१५.४),

निफाड ३५.५(१२.१), सांगली ३४.३ (२०.१), सातारा ३४.७ (१८.४), सोलापूर ३७.३(२२.१), सांताक्रूझ ३१.८ (२२.०), डहाणू ३१.४ (२१.०), रत्नागिरी ३१.६ (२२.८),

छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१६.१), नांदेड ३६.४ (२२.०), परभणी ३६.१ (२१.१), अकोला ३५.० (२१.०), अमरावती ३४.४(१९.८), बुलढाणा ३१.८ (१८.८), ब्रह्मपूरी ३८.० (२२.४), चंद्रपूर ३८.० (२३.६),

गडचिरोली ३५.४(२०.०), गोंदिया ३४.२ (२०.५), नागपूर ३५.३ (२०.६), वर्धा ३६.६(२२.४), वाशीम ३५.२ (१९.६), यवतमाळ ३५.५ (२०.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT