Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Summer Heat : वादळी पावसाने उघडीप देताच, राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात होरपळ वाढली आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाने उघडीप देताच, राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात होरपळ वाढली आहे. आज (ता. ३) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात आकाश निरभ्र होत झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव येथे ४३ अंश तापमान नोंदले गेले.

दरम्यान उन्हाचा चटका कायम असल्याने चंद्रपूर, सोलापूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४२ अंश, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार आहे. आज (ता. ३) कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३८.९, धुळे ४१, जळगाव ४१.७, कोल्हापूर ३७.२, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४३, नाशिक ३७.१, निफाड ३७.६, सांगली ३९.६, सातारा ३८.४, सोलापूर ४२.६, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३५, रत्नागिरी ३३.७,

छत्रपती संभाजीनगर ४०.८, बीड ४०.९, नांदेड ४१.६, धाराशिव ४०.४, परभणी ४१, अकोला ४३.१, अमरावती ४१.८, बुलडाणा ३८.६, ब्रह्मपुरी ४२.३, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४२.६, गोंदिया ३८.९, नागपूर ४०.८, वर्धा ४२.०, वाशीम ४१.८, यवतमाळ ४०.

उष्ण लाट, उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४३.१, मालेगाव ४३, चंद्रपूर ४२.८, सोलापूर ४२.६, गडचिरोली ४२.६, ब्रह्मपुरी ४२.३, वर्धा ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT