Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

Summer Heat : सूर्य पुन्हा तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या पार गेले आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य पुन्हा तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या पार गेले आहे. दोन दिवसांत राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. आज (ता. २३) राज्यात उन्हाच्या झळा, उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्‍चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा ३६ अंशांच्या पुढेच असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरू लागले आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होत पारा चाळिशीपार जाण्याचे संकेत आहेत.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३७.२, नगर ३५.८, धुळे ३८.०, जळगाव ३७.६, कोल्हापूर ३६.८, महाबळेश्वर ३१.४, नाशिक ३६.३, निफाड ३५.०, सांगली ३६.३, सातारा ३६.०, सोलापूर ३७.४, सांताक्रूझ ३८.८, डहाणू ३५.६, रत्नागिरी ३५.०,

छत्रपती संभाजीनगर ३५.५, नांदेड ३६.८, परभणी ३७.१, अकोला ३८.०, अमरावती ३६.०, बुलडाणा ३५.५, ब्रह्मपुरी ३६.२, चंद्रपूर ३६.४, गडचिरोली ३४.६, गोंदिया ३३.८, नागपूर ३५.०, वर्धा ३६.१, वाशीम ३८.४, यवतमाळ ३८.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT