Weather Summer Update agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : यंदा फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची चाहूल ; तापमानाच चढ-उतार कायम

Summer Heat : फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १०) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत ११० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. वायव्य भारतात थंडी कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. ९) पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्यात थंडी ओसरली असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान ३५ अंशांपार आहे.

अनेक ठिकाणी तापमान ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. आज (ता. १०) राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.२---१६.४

अहिल्यानगर---३३.८---१५.७

धुळे---३१.८---११.८

जळगाव---३२.२---१६.५

जेऊर---३५---१७.५

कोल्हापूर---३२.८---१९.८

महाबळेश्‍वर---२८.३---१७.५

मालेगाव---३२.६---१५.६

नाशिक---३३.७---१६.४

निफाड---३२.८---१४

सांगली---३४.२---१८.८

सातारा---३४---१७.५

सोलापूर---३६---२२.६

सांताक्रूझ---३४.५---२०

डहाणू---३०.७---१८.२

रत्नागिरी---३५.४---२०.५

छत्रपती संभाजीनगर---३३.५---१८.६

धाराशिव---३३---१७

परभणी---३४.७---१८.१

परभणी (कृषी)---३४---१६

अकोला---३५---१९

अमरावती---३२.४---१६.१

भंडारा---३१.६---१६.१

बुलढाणा---३४---२०

ब्रह्मपूरी---३४.४---१५.५

चंद्रपूर---३२.८---निरंक

गडचिरोली---३३.२---१५.६

गोंदिया---३०.६---१६.४

नागपूर---३२.४---१५

वर्धा---३२---१६.४

वाशीम---३४.६---२०.८

यवतमाळ---३३.६---१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT