Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Weather Warning : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Maharashtra Rain Forecast : राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ आकाश असून, किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ आकाश असून, किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. आज (ता. २८) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. २७) राजस्थानच्या ‘चुरू’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडी गायब झाली असून, शुक्रवारी (ता. २७) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १३.५ अंश तापमान नोंदले गेले.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असतानाच, पहाटेच्या वेळी दाट धुके पाहायला मिळत आहे. धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला जिल्ह्यांसह राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.६ (१६.४), अहिल्यानगर २८.२ (१८.६), धुळे ३० (१३.५), जळगाव ३०.३ (१९.१), जेऊर २९.५ (१९), कोल्हापूर २८.५ (२१), महाबळेश्‍वर २४.७ (१६.१), मालेगाव २८.२ (१८.४), नाशिक २९ (१६.५), निफाड २५.५ (१७.२), सांगली २८.४ (२१), सातारा ३०.२ (१९.५), सोलापूर ३१.८ (२१.१), सांताक्रूझ ३०.५ (१८.५),

डहाणू २७.९ (१८.३), रत्नागिरी ३०.८ (२१.७), छत्रपती संभाजीनगर २७.२ (१९.६), धाराशिव २९.१ (१८.४), परभणी २९.४ (२१.५), परभणी कृषी विद्यापीठ २८.१ (२०.९), अकोला ३१.६ (२०.१), अमरावती ३१.२ (२०.३), भंडारा २९.८ (१६.८), बुलडाणा ३० (१९.६), ब्रह्मपुरी ३३ (१८.८), चंद्रपूर २९ (-), गडचिरोली २८.२ (१८.८), गोंदिया २९.५ (१७), नागपूर ३०.३ (१९.२), वर्धा ३० (१८.९), वाशीम ३०.६ (२०.२), यवतमाळ २९.५ (-).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, नागपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT