Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : पारध परिसरात वादळी पाऊस

जालना जिल्ह्यातील पारध व परिसरात शुक्रवारी( ता. ३१) दुपारी दोनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Jalna News : जिल्ह्यातील पारध व परिसरात शुक्रवारी( ता. ३१) दुपारी दोनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निर्माण झाले होते. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वीस मिनिटे जोराचा पाऊस पडला.

या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. तर वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीचे रुग्ण वाढत आहे.

वादळी पावसामुळे आंब्याला मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरात सायंकाळी ४च्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. याशिवाय जवखेडा ठोंबरी येथे वादळी वा-यासह पंधरा मिनिटे पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चापानेर (ता. कन्नड) वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय उपळी पळशी (ता. सिल्लोड) परिसरात पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर शहरातही पावसाच्या सरी झाल्या. गल्लेबोरगाव येथे वादळी पावसास सुरवात झाली होती. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT