Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम

उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Pune News : सूर्य तळपल्याने उन्हाच्या झळा वाढून अंगाची लाही लाही होत आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सुरूच आहे.

आज (ता. १६) मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

उन्हाच्या झळा चांगल्याच तापदायक ठरत असून, उकाडा देखील चांगलाच वाढला आहे. शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ब्रह्मपूरी येथे तापमान ४२ अंशांवर होते. अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३६ ते ४० अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका वाढतच आहे.

शुक्रवारी (ता. १४) रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. यातच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

तर झारखंडपासून, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत. आज (ता. १६) मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.९ (२१.१), जळगाव ४१.३ (२५.७), धुळे ४०.० (२३.०), कोल्हापूर ३६.६ (२१.६), महाबळेश्वर ३१.१ (१५.७), नाशिक ३८.१ (२०.९),

निफाड ३९.६(१८.५), सांगली ३८.८ (२२.९), सातारा ३८.२ (२१.५), सोलापूर ४०.८ (२१.०), सांताक्रूझ ३५.४ (२५.०), डहाणू ३४.५ (२३.०), रत्नागिरी ३५.० (२५.२),

छत्रपती संभाजीनगर ३८.७ (२१.४), नांदेड - (२१.८), परभणी ४०.२ (२२.४), अकोला ४१.५ (२५.५), अमरावती ४०.४(२२.३), बुलढाणा ३८.४ (१९.०), ब्रह्मपूरी ४२.० (२६.८),

चंद्रपूर ४२.८ (२५.६), गडचिरोली ४०.०(२३.०), गोंदिया ४१.४ (२७.८), नागपूर ३९.९ (२६.६), वर्धा ४१.४(२७.६), वाशीम ४०.२ (२३.८), यवतमाळ ४०.५ (२४.५).

रविवारी (ता.१६) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT