Rain Alert Agrowon
हवामान

Vidarbha Rain Alert: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

IMD Weather Forecast: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भात दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: सूर्याच्या आगीमध्ये होपळून निघत असल्याने राज्यात असह्य चटका, उष्ण झळांनी जीव कासावीस होत आहे. अकोला, जळगाव येथे राज्याचे उच्चांकी ४३.७ अंश तापमान नोंदले गेले. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भात दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, आज ही प्रणाली निवळून जाणार आहे. मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, पश्‍चिम राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालींमुळे विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला आणि जळगाव पाठोपाठ मालेगाव येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अमरावती येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, तर धुळे, नाशिक, निफाड, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ११) विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १०) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---४०.७---२४.९

अहिल्यानगर---निरंक---२२.७

धुळे---४१.८---२४.२

जळगाव---४३.७---२६.२

जेऊर---४०.०---२३.०

कोल्हापूर---३७.८---२४.४

महाबळेश्‍वर---३३.३---१८.२

मालेगाव---४३.२---२३.२

नाशिक---४१.३---२३.३

निफाड---४१.८---१८.८

सांगली---३७.९---२४.५

सातारा---३९.७---२५.०

सोलापूर---४०.१---२७.४

सांताक्रूझ---३३.७---२७.४

डहाणू---३६.२---२४.९

रत्नागिरी---३५.६---२६.१

छत्रपती संभाजीनगर---४२.५---२५.५

धाराशिव---३९.८---२३.४

परभणी---४०.९---२४.८

परभणी (कृषी)---४०.०---२२.८

अकोला---४३.७---२७.०

अमरावती---४२.०---२३.३

भंडारा---३९.०---२३.०

बुलडाणा---३९.६---२७.४

चंद्रपूर---४२.२---निरंक

गडचिरोली---४०.२---२१.६

गोंदिया---३८.६---२०.४

नागपूर---४०.५---२२.४

वर्धा---४१.०---२१.४

वाशीम---४१.४---निरंक

यवतमाळ---४१.४---२२.८

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.४---४३.७

मराठवाडा---२२.८---४२.५

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.२---४०.१

उत्तर महाराष्ट्र---१८.८---४३.७

कोकण---२४.९---३६.२

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर.

४२ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

जळगाव ४३.७, अकोला ४३.७, मालेगाव ४३.२, छत्रपती संभाजीनगर ४२.५, चंद्रपूर ४२.२, अमरावती ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT