Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Winter Season: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Maharashtra Weather Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र होताच महाराष्ट्रात थंडी परतली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा पुन्हा ४.४ अंशावर आला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र होताच महाराष्ट्रात थंडी परतली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा पुन्हा ४.४ अंशावर आला आहे. राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. बुधवारी (ता. ८) राजस्थानच्या राजगडमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडी वाढताच कमाल तापमान काहीसे कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढत आहे. बुधवारी (ता. ८) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ४.४ अंश तापमान नोंदले गेले. जळगाव, निफाड, यवतमाळ, परभणी कृषी विद्यापीठ, गोंदिया, अमरावती, बुलडाणा येथे पारा १० अंशांच्या खाली आला आहे.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ९) राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसाला पोषक हवामान

उद्यापासून (ता. १०) राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बुधवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३०.४---१२.७

अहिल्यानगर---२९.१---१२.५

धुळे---२५.५---४.४

जळगाव---२९.८---८.२

जेऊर---३१.५---११.५

कोल्हापूर---३०.४---१६.८

महाबळेश्वर---२७.२---१२.९

मालेगाव---२५.०---१०.६

नाशिक---२६.५---१२.०

निफाड---२५.०---९.०

सांगली---३१.४---१५.५

सातारा---३०.६---१४.६

सोलापूर---३२.७---१५.५

सांताक्रूझ---३३.३---१९.०

डहाणू---२७.६---१६.१

रत्नागिरी---३४.०---१९.१

छत्रपती संभाजीनगर---२९.२---१०.३

धाराशिव---२९.५---१३.३

नांदेड---३०---१२.८

परभणी---२९.३---११.५

परभणी (कृषी)---२८.१---९.४

अकोला---३०.३---११.०

अमरावती---३०.०---९.८

भंडारा---२७.४---११.४

बुलडाणा---२५.४---९.८

ब्रह्मपुरी---३४.२---१०.१

चंद्रपूर---२९.६---निरंक

गडचिरोली---२९.४---११.०

गोंदिया---२९.४---९.४

नागपूर---२९.५---११.०

वर्धा---२९.५---११.०

वाशीम---२८.६---१३.६

यवतमाळ---२९.५---९.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT