Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Temperature Drop : किमान तापमानात होतेय घट

Maharashtra Weather Changes : राज्यातील गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानात घट होत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यातील गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानात घट होत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. ३) मध्य प्रदेशातील नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आकाश निरभ्र होत असल्याने स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येत आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा हळूहळू खाली घसरत असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.

शुक्रवारी (ता. ३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७ अंश तापमान नोंदले गेले. तसेच निफाड, परभणी कृषी विद्यापीठ आणि गोंदिया येथे किमान तापमान १० अंशांखाली होते. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३१.३---११.७

अहिल्यानगर---३१.८---१०.४

धुळे---२९---७

जळगाव---३०.३---१०.४

जेऊर---३२.५---११.५

कोल्हापूर---३०.५---१६.५

महाबळेश्वर---२६.१---१२.८

मालेगाव---२७.६---(-)

नाशिक---३०.८---११.३

निफाड---२७.५---८.२

सांगली---३२.०---१५.९

सातारा---३२.४---१४.६

सोलापूर---३३.८---१४.६

सांताक्रूझ---३४.८---१६.७

डहाणू---३०.२---१७.६

रत्नागिरी---३३.८---१९

छत्रपती संभाजीनगर---३२.४---१२.६

धाराशिव---३०.६---१३

परभणी---३०.५---१२.१

परभणी (कृषी)---२९.५---७.४

अकोला---३२.८---१२.६

अमरावती---३०.८---११.१

भंडारा---२८.२---११.०

बुलडाणा---२९.१---१३.५

ब्रह्मपुरी---३१.२---११.९

चंद्रपूर---२९.६---(-)

गडचिरोली---२९.६---११

गोंदिया---२८.८---८.८

नागपूर---३०---११

वर्धा---३०---११

वाशीम---३०.८---१५

यवतमाळ---३०.६---(-)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT