Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Weather : राज्यात थंडीचा कडाका कायम

Maharashtra Winter Season Update : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे झेपावत असल्याने राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम असून, पारा सातत्याने १० अंशांच्या खाली असल्याने हुडहुडी कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे झेपावत असल्याने राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम असून, पारा सातत्याने १० अंशांच्या खाली असल्याने हुडहुडी कायम आहे. गुरुवारी (ता. १९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ४.२ अंश तापमान नोंदविले गेले. राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली आज (ता. २०) उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचे संकेत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत असल्याने गुरुवारी (ता. १९) पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडीची तीव्रता कायम असल्याने धुळे, परभणी, निफाड, जेऊर, अहिल्यानगर, नांदेड येथे थंडीची लाट आहे. नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने थंडीचा कडाक्याने हुडहुडी जाणवत आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे धाव घेत असल्याने राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३० (८.९), अहिल्यानगर ३०.२ (७.५), धुळे ३२ (४.२), जळगाव ३१.३ (१०.४), जेऊर ३१.५ (७.१), कोल्हापूर २९.१ (१५.४), महाबळेश्‍वर २६.९ (१३.९), मालेगाव - (१०.६), नाशिक २९.३ (८.८), निफाड २८.७ (६.४), सांगली ३०.९ (१३.९), सातारा ३१.१ (११), सोलापूर ३३ (१४.६), सांताक्रूझ ३४.४ (१५.५),

डहाणू ३० (१६.१), रत्नागिरी ३४ (१६.५), छत्रपती संभाजीनगर ३०.२ (९.७), बीड २८.९ (९.५), धाराशिव २९.५ (१०.८), नांदेड - (७.६), परभणी २९.४ (९.७), परभणी कृषी विद्यापीठ २८.५ (५.५), अकोला ३२ (१०.९), अमरावती ३२ (११.४), भंडारा २७.४ (१०), बुलडाणा ३१ (१३), ब्रह्मपुरी ३१.७ (११), चंद्रपूर २८.४ (-), गडचिरोली २९.४ (११), गोंदिया २८.२ (९.६), नागपूर २९.१ (९.२), वर्धा २९.५ (१०), वाशीम ३१.६ (११.२), यवतमाळ २९.५ (-).

थंडीची तीव्र लाट असलेली ठिकाणे :

धुळे ४.२, परभणी (कृषी) ५.५, निफाड ६.४, जेऊर ७.१, अहिल्यानगर ७.५, नांदेड ७.६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT