Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी

Maharashtra Weather Forecast : आज (ता. २२) तापमानातील घट कायम राहणार असून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हुडहुडी वाढली आहे. निफाड आणि धुळे येथे किमान तापमानाचा पारा १०.५ अशांवर आले आहे. आज (ता. २२) तापमानातील घट कायम राहणार असून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. २१) दिल्ली येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातही गारठा वाढत असून, गुरुवारी (ता. २१) धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.५ अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा खाली आले आल्याने राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.३ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २१) किमान तापमानात घट कायम राहून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.३ (१२.२), अहिल्यानगर २९.८ (१२.३), धुळे (१०.५), जळगाव ३० (१३), कोल्हापूर २९.८ (१६.७), महाबळेश्वर २५.३ (१२.५), मालेगाव २७.४ (१४.२), नाशिक २८.५ (१२.४), निफाड २९.० (१०.५), सांगली ३०.१ (१४.९), सातारा २९.२ (१३.६), सोलापूर ३२.२ (१७),

सांताक्रूझ ३४.३ (१८.५), डहाणू ३४ (१९.३), रत्नागिरी ३३.५ (२१.२), छत्रपती संभाजीनगर २९ (१३.८), धाराशिव (१४.६), परभणी २९.१ (१४.५), परभणी कृषी विद्यापीठ २८.५ (११), अकोला ३१ (१६), अमरावती २९.६ (१५.२), बुलडाणा ३०, ब्रह्मपुरी २९.७ (१५), चंद्रपूर २९ (१४.८), गडचिरोली २८.६ (१३.४), गोंदिया २८.२ (१३.४), नागपूर २९.६ (१५.१), वर्धा २९.० (१५.०), वाशीम २९.६, यवतमाळ ३१.

बंगालच्या उपसागरात उद्या कमी दाबाचे संकेत

दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, या प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

१३ अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे

धुळे १०.५, निफाड १०.५, परभणी (कृषी) ११, पुणे १२.२, अहिल्यानगर १२.३, नाशिक १२.४, महाबळेश्वर १२.५, जळगाव १३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT