Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Forecast : उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

Maharashtra Weather Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली असून, निफाड आणि धुळे येथे किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या खाली घसरला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली असून, निफाड आणि धुळे येथे किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. २०) तापमानातील घट कायम राहणार असून, राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोमोरिन भाग आणि तमिळनाडू परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात उद्यापर्यंत (ता. २२) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे आणि त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. १९) राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातही गारठा वाढत असून, मंगळवारी (ता. १९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.८ अंश तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा खाली आले आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २०) किमान तापमानात घट कायम राहून, गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१२.९), अहिल्यानगर ३० (११.६), धुळे (१०.८), जळगाव ३१.८ (१३.८), कोल्हापूर ३०.४ (१७.३), महाबळेश्‍वर २३.८ (१३.८), मालेगाव २८.६ (१५), नाशिक ३०.६ (१२.७), निफाड २९ (१०.९), सांगली ३१.७ (१६), सातारा २९.५ (१४.७), सोलापूर ३३ (१६.८), सांताक्रूझ ३६ (१९), डहाणू ३३.६ (१९.५),

रत्नागिरी ३५ (२०.६), छत्रपती संभाजीनगर ३१.१ (१४.४), धाराशिव (१५.४), नांदेड (१३.६), परभणी २९.४ (१४.६), परभणी कृषी विद्यापीठ २९.६ (११.६), अकोला ३१.७ (१५.४), अमरावती ३१.६ (१४.६), बुलडाणा २९.६ (१५.४), ब्रह्मपुरी ३२.४ (१४.२), चंद्रपूर ३०.४ (१४.६), गडचिरोली ३० (१४.४), गोंदिया ३० (१३.२), नागपूर ३०.८ (१३.५), वर्धा ३० (१४.९), वाशीम ३४.४, यवतमाळ (१६).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT