Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: रत्नागिरीत उन्हाचा कहर! देशातील उच्चांकी तापमानाची नोंद

Maharashtra Weather Update : होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढत असून, कोकणातील रत्नागिरी येथे शनिवारी देशातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: सूर्याने झळाळी घेतल्याने यंदा होळीपूर्वीच उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे देशातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान अंदाज आहे.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कमाल तापमानात होत असून, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. शनिवारी (ता. २२) कोकणातील रत्नागिरीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जेऊर आणि विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ, सांगली, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे पारा ३६ अंशांच्या पार होता.

उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा कायम असल्याने शनिवारी (ता. २२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.२---१५.३

अहिल्यानगर---३५.०---१४.५

धुळे---३४.०---११.६

जळगाव---३४.४---१२.२

जेऊर---३७.०---१६.०

कोल्हापूर---३५.४---२०.८

महाबळेश्वर---३१.०---१७.२

मालेगाव---३३.४---१५.६

नाशिक---३४.३---१४.६

निफाड---३३.३---१०.७

सांगली---३६.५---१८.९

सातारा---३५.६---१८.४

सोलापूर---३७.६---२१.६

सांताक्रूझ---३६.३---२०.४

डहाणू---३३.२---२०.६

रत्नागिरी---३८.६---२१.९

छत्रपती संभाजीनगर---३५.०---१७.०

धाराशिव---३४.८---१९.०

परभणी---३६.१---१८.०

परभणी (कृषी)---३४.६---१३.५

अकोला---३६.६---१८.०

अमरावती---३५.६---१६.५

भंडारा---३५.०---१८.०

बुलडाणा---३३.५---१८.०

ब्रह्मपुरी---३७.५---१६.९

चंद्रपूर---३६.८---निरंक

गडचिरोली---३६.०---१७.०

गोंदिया---३६.०---१७.०

नागपूर---३६.४---१७.२

वर्धा---३६.४---१६.२

वाशीम---३५.६---निरंक

यवतमाळ---३६.४---१६.२

३७ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

रत्नागिरी ३८.६, सोलापूर ३७.६, ब्रह्मपुरी ३७.५, जेऊर ३७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT