Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा! तापमानाचा पारा ३६ अंशांवर

Weather Forecast: राज्यात गेले काही दिवस कमाल तापमान सातत्याने पस्तिशीपार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाचा चटका, उकाडा त्रासदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश, तर निफाड येथे नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News: राज्यात गेले काही दिवस कमाल तापमान सातत्याने पस्तिशीपार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाचा चटका, उकाडा त्रासदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश, तर निफाड येथे नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पश्चिम हिमालयाच्या भागात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० ते १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. शुक्रवारी (ता. १४) पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात १० अंश तापमान नोंदविले गेले. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ ते २० अंशांच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरसह सांगली, जेऊर, सांताक्रूझ, रत्नागिरी येथे ३६ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी पारा ३३ ते ३० अंशाच्या दरम्यान आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात तब्बल १७ ते २१ अंशांची तफावत दिसून येत आहे. आज (ता. १५) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.७---१३.४

अहिल्यानगर---३३.८---१२.४

धुळे---३१.०---१०.०

जळगाव---३२.४---१२.२

जेऊर---३६.०---१४.५

कोल्हापूर---३५.५---.१९.६

महाबळेश्वर---३१.१---१६.५

मालेगाव---३१४---१४.२

नाशिक---३१.७---१२.८

निफाड---३०.८---९.५

सांगली---३६.२---१७.८

सातारा---३४.७---१५.८

सोलापूर---३६.६---१८.६

सांताक्रूझ---३६.०---१९.२

डहाणू---३२.४---१८.०

रत्नागिरी---३६.०---१९.५

छत्रपती संभाजीनगर---३३.८---१५.५

धाराशिव---३३.५---१७.२

परभणी---३४.५---१४.५

परभणी (कृषी)---३२.७---११.४

अकोला---३४.८---१४.७

अमरावती---३३.०---१३.३

भंडारा---३०.८---१३.६

बुलडाणा---३१.६---१६.६

ब्रह्मपुरी---३४.३---१३.०

चंद्रपूर---३३.८---निरंक

गडचिरोली---३३.६---१४.४

गोंदिया---३०.४---१५.५

नागपूर---३२.४---१२.४

वर्धा---३३.२---१४.०

वाशीम---३३.४---१८.६

यवतमाळ---३४.६---१३.५

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३६.६, सांगली ३६.२, जेऊर ३६, सांताक्रूझ ३६, रत्नागिरी ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT