Rain Alert  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Weather Update : तापमान चाळीशीपार असल्याने उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : तापमान चाळीशीपार असल्याने उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर उद्यापासून (ता. १) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर अंतर्गत तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होत आहे.

दरम्यान रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, अकोला, गडचिरोली आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा तापमान नोंदले गेले. जेऊर, अमरावती, ब्रह्मपूरी, नागपूर आणि यवतमाळ येथे तापमान ४० अंशांच्या वर होते.

ढगाळ हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे. आज (ता. ३१) कोकण पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उद्यापासून (ता. १) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३७.८---२१.५

अहिल्यानगर---३८.२---२३.३

धुळे---३८.०---१६.५

जळगाव---३९.०---२०.७

जेऊर---४०.०---२४.०

कोल्हापूर---३७.८---२३.७

महाबळेश्वर---३१.८---२१.३

मालेगाव---३८.२---१९.६

नाशिक---३७.८---१९.७

निफाड---३७.८---१६.७

सांगली---३७.४---२३.८

सातारा---३७.८---२५.०

सोलापूर---४१.४---२६.५

सांताक्रूझ---३६.३---२४.३

डहाणू---३३.१---२३.५

रत्नागिरी---३४.२---२४.५

छत्रपती संभाजीनगर---३८.४---२५.४

धाराशिव---३८.४---२४.०

परभणी---३९.८---२४.०

परभणी (कृषी)---३८.७---२१.१

अकोला---४१.४---२२.३

अमरावती---४०.४---२४.०

भंडारा---३८.४---२२.०

बुलढाणा---३७.२---२३.८

ब्रह्मपूरी---४०.४---२२.२

चंद्रपूर---४२.०---निरंक

गडचिरोली---४१.२---२०.०

गोंदिया---३८.६---२०.५

नागपूर---४०.६---२०.४

वर्धा---४१.०---२२.८

वाशीम---३९.८---निरंक

यवतमाळ---४०.२---२४.२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.०---४२.०

मराठवाडा---२१.१---३९.८

पश्‍चिम महाराष्ट्र---२१.३---४१.४

उत्तर महाराष्ट्र---१६.७---३९.०

कोकण---२३.५---३६.३

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा अंदाज :

मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT