Summer Heat Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : कमाल, किमान तापमानात वाढ शक्य

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे उच्चांकी ३७ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे उच्चांकी ३७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ११) राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उत्तर भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १२० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. सोमवारी (ता. १०) राजस्थानमधील सांगरीया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरीसह जेऊर आणि अकोला येथे तापमान ३५ अंशांपार आहे. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे.

उन्हाच्या झळा वाढत असून, उकाड्यामुळे आंगाची लाही होत आहे. आज (ता. ११) राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.४---१७.७

अहिल्यानगर---निरंक---१७.३

धुळे---३२.०---१२.०

जळगाव---निरंक---१६.८

जेऊर---३५.५---१८.०

कोल्हापूर---३३.१---२०.५

महाबळेश्वर---२८.१---१८.०

मालेगाव---३२.४---१७.०

नाशिक---३३.८---१६.४

निफाड---३२.५---१४.२

सांगली---३४.३---१९.९

सातारा---३४.२---१८.६

सोलापूर---निरंक---२२.९

सांताक्रूझ---३४.३---२०.१

डहाणू---२९.६---१८.६

रत्नागिरी---३४.६---२१.५

छत्रपती संभाजीनगर---३३.८---१९.३

धाराशिव---निरंक---१७.८

परभणी---३४.४---१९.०

परभणी (कृषी)---३३.८---१६.०

अकोला---३५.६---१९.७

अमरावती---३४.४---१७.७

भंडारा---३३.६---१७.०

बुलढाणा---३४.०---२१.२

ब्रह्मपूरी---३७.०---१६.०

चंद्रपूर---३४.०---निरंक

गडचिरोली---३३.०---१५.२

गोंदिया---३२.६---१७.९

नागपूर---३४.०---१६.२

वर्धा---३४.२---१७.४

वाशीम---३४.२---२२.८

यवतमाळ---३४.६---१६.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT