Maharashtra Heatwave Alert:
डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्रावरील हवेचे दाब आजपासून शनिवार (ता. २ ते ८) पर्यंत १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. या आठवड्यानंतर कमाल व किमान तापमानात वेगाने वाढ होत जाईल. दुपारच्या सापेक्ष आर्द्रता घट होईल. हवामान उष्ण आणि कोरडे राहील. महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वारे ताशी ११ ते १३ कि.मी. वेगाने वाहतील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. उष्ण वारे वाहण्यामुळे दुपारी तापमानात वाढ होऊन उष्ण हवामान जाणवेल.
मध्य विदर्भात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्य आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. कमाल तापमानातील वाढीने हवेचे दाब कमी होतील व दुपारी उष्ण वारे वाहतील. उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे किमान तापमानात वेगाने वाढ होणार नाही. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १९ अंश सेल्सिअस, तर इक्वेडोरजवळ ते २५ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव राहील. हिंदी महासागराच्या व अरबी समुद्राचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्यामुळे वेगाने बाष्पनिर्मिती होऊन हवामान ढगाळ राहणे शक्य आहे.
कोकण :
कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६० ते ६५ टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात २६ टक्के इतकी कमी राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३८ टक्के, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ४८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान धुळे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदुरबार जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ४० टक्के, धुळे जिल्ह्यात ४९ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ६१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १८ ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा :
कमाल तापमान हिंगोली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान हिंगोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर बीड व परभणी जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश
अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३७ ते ३८ टक्के, तर लातूर, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत ४२ ते ४३ टक्के राहील. बीड व धाराशिव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ५९ टक्के, तर जालना जिल्ह्यात ६१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात १७ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २३ ते २९ टक्के इतकी कमी राहील. धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १३ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, बुलडाणा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४४ ते ४९ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, नागपूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ४९ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात २७ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २८ टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ कि.मी., तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ताशी ३ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५७ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५ कि.मी., तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ८ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान सांगली व सातारा जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, कोल्हापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४८ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ५१ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात ६६ टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ७१ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १७ ते २० टक्के, तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३१ ते ३९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला :
- दोन पाण्याच्या पाळ्यांतील अंतर कमी करावे. ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
- जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.
- जनावरांना योग्य निवारा करून सावलीची सोय करावी.
- फळबागांवर ६ टक्के केओलीन द्रावणाची फवारणी करावी. जेणेकरून बाष्पीभवनाचा वेग कमी होईल.
- गहू पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.