Rain Update Agrowon
हवामान

Konkan Rain Update : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

Konkan Weather News : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Team Agrowon

Monsoon Rain Update : पुणे : मॉन्सून सक्रिय होणार असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. ६) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, चुरू, गुना, सिधी, अंबिकापूर, बालासोरपासून मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारला आहे. १५ अंश उत्तर अक्षांशालगत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सापाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्येही चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. ६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज (ता. ५) राज्यातील पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
नगर.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT