Weather Agrowon
हवामान

Weather Update : बुधवारपासून होणार पावसाला पोषक हवामान

Weather Forcast : राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्याने गारठा कमी होत आहे. तर बुधवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Pune News : डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज (ता. १) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्याने गारठा कमी होत आहे. तर बुधवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडी पुन्हा वाढू लागली आहे. रविवारी (ता. ३१) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागात किमान तापमान ६ ते ९ अंशांच्या दरम्यान होते. उत्तर भारतातील अनेक राज्यात दाट धुके पाहायला मिळत असून, पंजाब हरियाना, उत्तर प्रदेशात थंड दिवस अनुभवायला मिळत आहे.

रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.५ (१२.८), धुळे ३१.० (११.६), जळगाव ३१.७ (१४.३), कोल्हापूर ३१.२ (१६.९), महाबळेश्वर २८.८ (१५.२), नाशिक ३१.५ (१३.८), निफाड ३०.१ (११.८), सांगली ३१.२ (१५.५), सातारा ३१.२ (१३.९), सोलापूर ३३.०(१७.९), सांताक्रूझ ३२.९ (२०.०), डहाणू ३२.१ (१९.१), रत्नागिरी ३४.६ (२०.१), छत्रपती संभाजीनगर ३०.० (१५.०),

नांदेड २८.८ (१७.०), परभणी ३०.० (१५.५), अकोला ३१.७ (१६.५), अमरावती २९.४ (१५.१), बुलडाणा ३०.३ (१६.२), ब्रह्मपुरी ३१.३ (१६.२), चंद्रपूर २८.८ (१४.०), गडचिरोली २९.० (१४.४), गोंदिया २७.६ (१२.०), नागपूर २८.४(१४.१), वर्धा २९.०(१४.९), वाशीम ३०.२ (१४.४), यवतमाळ ३१.० (१६.५).

कमी दाबाचे क्षेत्र कायम

विषुववृत्तीय हिंद महासागर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. वायव्येकडे सरकत असलेली ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २) आणखी तीव्र होत तिचे ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली. किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या वर गेला आहे. रविवारी (ता. ३१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १४ अंशांच्या वरच आहे. आज (ता. १) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता.३) कोकणात गुरुवारपासून (ता. ४) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT